बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणारे उमेदवार श्री. विठ्ठल भुजंगराव तळेकर यांना राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन, महाराष्ट्रच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
पदवीधर मतदारांचे प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या समस्या, शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय तसेच ओबीसी व बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तळेकर यांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी तळेकर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेऊन त्यांच्या विजयासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
पदवीधर, विद्यार्थी, युवक, कर्मचारी तसेच ओबीसी व बहुजन समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडून न्याय मिळवून देतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन, महाराष्ट्रचे संस्थापक उमेश नानचंद आनेराव यांच्या नेतृत्वाखाली संघटना ओबीसी व बहुजन समाजाच्या विविध प्रश्नांसाठी कार्यरत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तळेकर यांना पाठिंबा देऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
— राष्ट्रीय ओबीसी फाऊंडेशन, महाराष्ट्र