*बीड, (बातमीदार):* भक्ती व शक्ती चे संगम असलेले भगवान भक्ती गड या तीर्थक्षेत्र येथे लोकनेते नामदार पंकजाताई मुंडे यांचा भव्य दसरा मेळावा होनार *मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सावरगाव घाट* येथे पार पडणार आहे.
या मेळाव्यातून तांईंचे मार्गदर्शन ऐकायला महाराष्ट्राच्या कानाकोपरेतून लाखोंचा जनसागर जमनार आहे.
भगवान बाबाची भक्ती मार्ग व गोपीनाथ मुंडे साहेब यांचे विचारांचा वारसा जाणून घेण्यासाठी आणि सामाजिक सद्भावनेचे संदेश अधिक मधुर करण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय बंजारा क्रांती दल बीड जिल्हा अध्यक्ष भुषण पवार यांनी केले आहे.
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेशी नाते जोडण्याची, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याची आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याची परंपरा जोपासली. याच परंपरेशी जोडलेला पंकजाताई मुंडे यांचा दसरा मेळावा हा अनेक कार्यकर्त्यांसाठी विचार, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण सोहळा आहे.
दसरा मेळावा म्हणजे केवळ गर्दीचा सोहळा नसून, विचारांचे आदानप्रदान करण्याची, सामाजिक प्रश्नांवर संवाद साधण्याची आणि समाजातील विविध घटकांना एकत्र येण्याची संधी आहे. या मेळाव्यातून मिळणारे विचाररूपी सोने प्रत्येकाने आपल्या जीवनात आणि सामाजिक कार्यात जपावे, हीच या परंपरेची खरी भावना आहे.
भुषण पवार यांनी आवाहन करताना सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---
*लोकनेते पंकजाताई मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे - भुषण पवार*

निर्भीड महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरील ताज्या बातम्या वाचा.
← मुख्यपृष्ठावर परत जा