पुरंदर, दि. २२ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय कैकाडी समाज महासंघाच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी वीर येथील अमोल जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे पुरंदर तालुक्यातील कैकाडी समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
समाज संघटन अधिक मजबूत करणे, समाज बांधवांच्या विविध समस्या सोडविणे आणि सामाजिक विकासाला चालना देणे, या उद्देशाने आयोजित बैठकीत अमोल जाधव यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात महासंघाचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवडीसाठी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. संजयजी मेढे साहेब, कार्याध्यक्ष श्री. दिगंबर जाधव , सरचिटणीस श्री. गोरख माने, मानसिंग जाधव, नवनाथ जाधव, राज्य सचिव कैलास जाधव ,राजनेते अमोल माने, राज्य महिला उपाध्यक्षा संगीताताई माने, तसेच महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
निवडीनंतर अमोल जाधव यांनी समाजाच्या एकजुटीसाठी, संघटन बळकट करण्यासाठी आणि समाज बांधवांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमोल जाधव यांच्या निवडीबद्दल महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाज बांधवांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अखिल भारतीय कैकाडी समाज महासंघाच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी अमोल जाधव यांची बिनविरोध निवड

अखिल भारतीय कैकाडी समाज महासंघाच्या पुरंदर तालुकाध्यक्षपदी अमोल जाधव यांची बिनविरोध निवड
← मुख्यपृष्ठावर परत जा