अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:-
श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दांडिया महोत्सव उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या कार्यक्रमात आकर्षक पारंपरिक वेशभूषा करून दांडियाच्या तालावर थिरकणारी विद्यार्थ्यांची पावले, जल्लोष पूर्ण वातावरण यामुळे विद्यालय परिसर आनंदात रंगून गेला.
कार्यक्रमासाठी गौरी गणेश भोस, महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य दिलीप भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार पीटर रणसिंग, डॉ. शुभांगी दरेकर, गंगाराम मचे, सतीश भुजबळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सांघिक भावना आणि भारतीय संस्कृतीविषयीची आवड वाढीस लागते, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
दांडिया महोत्सवास पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट दांडिया आणि उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कारांसाठी विद्यालयाच्या वतीने तसेच पालक श्री. कारंजकर यांच्या वतीने सन्मान चिन्ह देण्यात आले.दौंड येथील महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने डॉ.शलाका लोणकर-बंगाळे यांनी विद्यालयास वजन काटा भेट दिला. याबरोबरच कार्यक्रमासाठी त्रिमूर्ती भेळचे चंद्रकांत चौधरी, महावीर वस्त्र भांडारचे हर्षद भंडारी, उत्कर्ष इंटरप्राईजेसचे भूषणकुमार नरके, गांधी जम्बो झेरॉक्सचे रोहन गांधी, शिवशाही कलेक्शनच्या रोहिणी बोरुडे, ब्राईट लर्नर अकॅडमीचे रिजवान हकीम, डॉ. शुभांगी दरेकर, ताहीर तांबोळी यांनी प्रायोजकत्व दिले. तसेच सुडगे इव्हेंट्सच्या प्रवीण सुडगे यांनी कार्यक्रमासाठी केलेली आकर्षक रोषणाई व अत्याधुनिक साऊंड सिस्टिमने कार्यक्रमात रंगत आणली.
विद्यार्थ्यांचे नृत्यकौशल्य, तालबद्ध सादरीकरण, वेशभूषा आणि एकूण सहभाग यांचे विभा गुगळे, कोमल पटेल आणि निर्मला पिपाडा यांनी परीक्षक म्हणून काम पहात कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका शेख एस.ए. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या डान्स कोरिओग्राफर श्रद्धा कोकणे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
भारतीय संस्कृती व परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि सामाजिक सहकार्याची भावना वृद्धिंगत करणारा हा दांडिया महोत्सव विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आल्याबद्दल पालकांनी शालेय प्रशासनाचे कौतुक केले.
महादजी शिंदे इंग्लिश मीडियम मध्ये रंगला दांडिया महोत्सव; विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

निर्भीड महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरील ताज्या बातम्या वाचा.
← मुख्यपृष्ठावर परत जा