महाराजा कॉलेजचे यश खो-खो 19 वर्ष मुली जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी:-
दिनांक 16 ऑक्टोबर 2026 रोजी बुऱ्हाणनगर जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय 19 वर्षे मुली खो-खो स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयातील खेळाडूंनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम दोन फेरी मध्ये प्रथम फेरीमध्ये पाथर्डी व कॉटर फायनल मध्ये नगर तालुका संघांना हरवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. सेमी फायनल मध्ये कर्जत संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. परंतु तिसऱ्या नंबर साठी यश मिळवत तृतीय क्रमांक मिळवला अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या संघातील उत्कृष्ट खेळी करणारे दोन खेळाडू समीक्षा गरुड व नम्रता हरिहर यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन मा. आ. बबनराव पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. बाबासाहेब भोस, मा. आ. राहुल जगताप, सदस्य महावीर पटवा, क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वरिष्ठ उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, ज्युनिअर उपप्राचार्य प्रा. श्रीकांत थोरात, पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे, विभागप्रमुख प्रा उषा बोरुडे, प्रा विजय मगर, प्रा संदीप दरेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय डफळ आणि क्रीडा संचालिका कल्पना बागुल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.