*आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठाच्या उपाध्यक्षपदी डॉ. ज्योती शिरसाट यांची निवड*
पुणे: आध्यात्मिक क्षेत्रातील एक नामांकित संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठu संस्थेच्या उपाध्यक्षपदी डॉ. ज्योती शिरसाट यांची नुकतीच निवड करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. सोपानकाका वाल्हेकर महाराज यांच्या हस्ते शिरसाट यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. डॉ. ज्योती शिरसाट यांचे आध्यात्मिक, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील काम लक्षात घेऊन मुक्ताई ज्ञानपीठ संस्थेच्या सदस्यांनी सर्वानुमते ही निवड केली.
आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाच्या पुढे श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर असा आदिशक्ती मुक्ताई माऊलींचा आषाढी पायी वारी सोहळा गेली ३६ वर्षे सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन अशा सामाजिक उपक्रमातून समाज प्रबोधनाचे कार्य संस्थेचे अध्यक्ष सोपानकाका वाल्हेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या निवडीबद्दल समाजातील विविध मान्यवरांकडून डॉ. ज्योती शिरसाठ
यांचे अभिनंदन करण्यात आले.
आदिशक्ती मुक्ताई ज्ञानपीठाच्या उपाध्यक्षपदी डॉ. ज्योती शिरसाट यांची निवड

निर्भीड महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरील ताज्या बातम्या वाचा.
← मुख्यपृष्ठावर परत जा